मुंबईच्या रस्त्यावर ‘बर्निंग कार’, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून राख.

52

मुंबईच्या रस्त्यावर ‘बर्निंग कार’, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून राख.

Burn the 'burning car', Innova car completely on the roads of Mumbai.

✒राज शिर्के प्रतिनिधी✒
मुंबई, 16 मार्च:- मुंबईतून आगीची एक भीषण आणि खळबळजनक घटना समोर येते आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात ही घटना घडली. इनोव्हा गाडीला आग लागली आहे. दरम्यान कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आग लागल्यानंतर बाहेर पडण्यास यश मिळालं आहे. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. यानंतर बराच वेळ गाडी रस्त्यावर पेटत राहिली. उपस्थितांनी कारला आग लागल्याचे अग्निशमन दलाला फ़ोनच्या मध्यमातुन कळवले, पण अग्निशमन दलाची गाडी घटनस्थळी पोहोचेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीमध्ये आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांना आगवर नियंत्रण मिळवल तरी गाडी पुर्णत जळून राख झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याचा शोध घेतला जात आहे.