पुण्याच्या शिवाजी मार्केटला भीषण आग, पंचवीस दुकाने जळून खाक.

51

पुण्याच्या शिवाजी मार्केटला भीषण आग, पंचवीस दुकाने जळून खाक.

Pune's Shivaji Market on fire, 25 shops burnt down

✒पुणे प्रतिनिधी✒
पुणे, 16 मार्च:-
 पुण्याच्या कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत या मार्केट मधील पंचवीस दुकाने जळून खाक झाली आहे. त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीत.

Pune's Shivaji Market on fire, 25 shops burnt down

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये मटण आणि चिकनची दुकाने आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती.

Pune's Shivaji Market on fire, 25 shops burnt down

त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केटला भीषण आग लागली. या आगीत तब्बल पंचवीस दुकाने जळून भस्मसात झाली आहे. दुर्दैवाने दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्यांचा मात्र आगीत जळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकलेले नाही.