यवतमाळ येथे डॉक्टर युवतीची गळफास लावून केली आत्महत्या.

62

यवतमाळ येथे डॉक्टर युवतीची गळफास लावून केली आत्महत्या.

Doctor commits suicide by hanging in Yavatmal.

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी✒
यवतमाळ:- जिल्हातील वणी येथील जैन ले आऊट परीसरात राहणारी कु.काजल सुरेश ढेंगळे वय 23 वर्ष या डॉक्टर युवतीने घरी खिडकीला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काजल ही नुकतीच एमबीबीएस डॉक्टर झाली होती. 15 दिवसानंतर तीच्या बहीणीचे लग्न असताना तीने आत्महत्या केली. 14 मार्च ला दुपारी आई- वडील काही कामानिमित्त बाहेर गेले असतांना काजल आपल्या आजी सोबत घरी होती. हीच संधी पाहुन काजल आपल्या रुममधी जाऊन, खिडकीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण सध्या कळू शकले नसुन, समोरील तपास पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ही माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.