वडनेर येथे चोरी, पोलिसांनी केल आरोपीला अटक

59

वडनेर येथे चोरी, पोलिसांनी केल आरोपीला अटक

Theft at Wadner, police arrested the accused

प्रा. अक्षय पेटकर प्रातिनिधि✒
हिंगणघाट,दि.15 मार्च:- तालूक्यातील वडनेर येथे चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन जेल मध्ये रवानगी केली आहे.

पोलीस स्टेशन वडनेर येथे दिनांक 14 मार्च ला फिर्यादी नामे कल्याणी शंकरराव करलुके वय 23 वर्ष रा. वडनेर हिचे तक्रारीवरून अप क्रमांक 62 /2021 कलम 454, 457, 380 भा.द.वि. चा गुन्हा नोंद झाला. यातील फिर्यादी ही तिच्या आईच्या घरी दिनांक 13 मार्च ला रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान बाहेर गेली होती. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता घरी येऊन दरवाजा उघडला असता तिचे घराच्या मागील कुडा मातीची भिंत फोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एलईडी टीव्ही कीमत अकरा हजार रुपय व रोख रक्कम पंधराशे रुपये घेऊन पसार झाला.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा व चोरीस गेलेला मुद्देमालाचा गोपनीय सूत्राच्या माध्यमातून वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शेटे यांची मार्गदर्शनात पो. हवा अमित नाईक, निलेशसिंग सूर्यवंशी, लक्ष्मण केंद्रे, यांनी गुन्ह्यातील आरोपीचा व चोरीस गेलेला मुद्देमाल याचा शोध लावला. आणि चोरीस गेलेला मुद्देमाल एक काळया रंगाची इगो कंपनीचा एल.ई.डी. टीव्ही. किंमत 11000 रुपये व रोख रक्कम 1500 रुपये चोरल्याची कबुली आरोपी भीमानंद उर्फ भीमराव सुखदेवराव तागडे वय 40 वर्ष रा. वडनेर यांनी दिल्याने त्याचे जवळून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांचा मार्गदर्शनात अमित नाईक, लक्ष्‍मण केंद्रे निलेश सिंग पुढील तपास करीत आहेत,आरोपीची रवानगी वर्धा जेल मध्ये केली आहे.