जिथं काम होत नाही तिथं प्रहारला आठवा : रुग्णमित्र गजुभाऊ कुबळे

64

जिथं काम होत नाही तिथं प्रहारला आठवा : रुग्णमित्र गजुभाऊ कुबळे

प्रहार च्या पाठपुराव्यास यश.

Remember the strike where work is not done: patient friend Gajubhau Kubale

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे चंद्रपुर जिल्हा सम्पर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बंगाली कॅम्प च्या समस्या विषयी बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महा राज्य यांच्या सहकार्याने आज 35 वर्षानंतर बंगाली कॅम्प वासियांना पाणी मिळाले.

35 वर्षांपासून एकाच बोरिंगवर 90 ते 100 कुटुंब पाण्याची तहान भागवत होते गेल्या अडीच वर्षांपासून माझ्या प्रहार तर्फे मी पाठपुरावा करत करत मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नगर परिषद ने आठ दिवसात नवीन नळ व बोरिंग मारून पाण्याची समस्या निकाली काढू असे आश्वासन मा जिल्हाधिकारी साहेबान समोर देण्यात आले. शेवटी पाण्याची समस्या संपली. नगर परिषद मुख्यधिकारी मॅडम, पिदूरकर साहेब, करदोळे साहेब व सम्पूर्ण पाणी पुरवठा विभाग यांचे सर्वांनी आभार मानले.