ठाणे, कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रक्रोप, गेल्या 24 तासात एक हजार रुग्ण.
✒️राजु मोरे प्रतिनिधी✒️
ठाणे,दि.18 मार्च:- प्रशासनाने अनेक निर्बंध लाहुनही ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव नाही घेत असल्याचे आकडा वरुन दिसून येत आहे. 17 मार्च बुधवारी ठाण्यात कोरोनाचे 493 कोरोना वायरस बांधित नवे रुग्ण समोर आले आहे, तर कल्याण-डोंबिवलीत 593 नवे कोरोना वायरस बांधीत रुग्ण आढळले. यामुळे केवळ या तीन शहरांमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे त्यामूळे लोकांत भीतीचे वातावरण आहे.
कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक विनामास्क राजरोस फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाचे भय लोकांच्या मनात एक तर कमी झाले आहे किंवा बंधने पाळण्यास लोक विटले आहेत.
या तिन्ही शहरांत प्रचंड गर्दी असून, एकाचवेळी हजारो लोक बंधने पायदळी तुडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करून नियम न पाळल्यास कारवाई अटळ आहे, असा संदेश ठळकपणे देण्यात संबंधित महापालिकांना यश आलेले नाही. दररोज काही शेकडा लोकांवर कारवाई होते. पण नियम तोडणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ती संख्या नगण्य आहे.
सध्या विवाह सोहळ्यांना या शहरांत ऊत आला आहे. अनेक विवाह सोहळ्यांत निमंत्रितांचे बंधन पाळले जात नाही. गावात होणारी लग्ने, हळदीचे कार्यक्रम, डीजे लावून नाचगाणी याला एकाचवेळी शेकडो लोक हजर असतात.
महानगर पालिका तर्फे निर्बंध लागू.
कल्याण वाढत्या रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवलीत आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार लग्न सभारंभाला 50, तर अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. होम क्वारंटाइन रुग्णाच्या हातावर शिक्का मारला जाईल.