सिंदेवाहीत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने केला पत्नीवर ब्लेडने वार.

62

सिंदेवाहीत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने केला पत्नीवर ब्लेडने वार.

पत्नीला ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केले.
पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 On the second day of the wedding in Sindevahi, the husband stabbed his wife.

✒️मनोज खोब्रागडे चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
चंद्रपूर,दि.18 मार्च :- जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एक दिवसा अगोदर लग्न झाल. लग्नाचे नव जीवनाचे नवरीने सप्न बघायचा अगोदरच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीने नवविवाहित पत्नीवर ब्लेडने वार करून गंभीर स्वरुपात जखमी केले. ही घटना मंगळवारी दि.16 दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यालतील लोणवाही येथील राजीव गांधी कॉलनीत घडली. बाहेर फिरायला न गेल्याच्या कारणातून पतीने हे कृत्य केल्याचे म्हटले जाते. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद माधव आत्राम वय 28 वर्ष असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.

चंद्रपुर जिल्हातील सिंदेवाही तालुक्याचतील लोनवाही येथील एका मुलीचे चिमूर तालुक्यातील पसरगाव येथील प्रमोद आत्राम याच्याशी 15 मार्चला लग्न झाले. दुसऱ्या दिवशी ती आपल्या पतीसह लोणवाहीला माहेरी आली. मुलगी, जावई आल्याने कुटुंबीय आनंदी होते. अशात प्रमोदने पत्नीजवळ बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, लग्नाचा दुसराच दिवस असल्याने बाहेर फिरायला जाण्यास तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रमोदने पत्नीवर ब्लेडने हल्ला केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेची तक्रार सिंदेवाही पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद आत्राम याला अटक करून गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.