बुलढाणा रुग्णवाहिकेचा फुटला टायर; घडला भीषण अपघात, रस्तावर झोपलेले पाच चिरडले.

58

बुलढाणा रुग्णवाहिकेचा फुटला टायर; घडला भीषण अपघात, रस्तावर झोपलेले पाच चिरडले.

Buldhana ambulance's flat tire; A horrible accident happened, five crushed sleeping on the road.

✒बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी✒
बुलढाणा:- येथून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेले पाच जण चिरडले गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील त्रिशरण चौकात घडली. या अपघातातील दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

आपले पोट भरण्यासाठी काही लोक आपल्या परीवारा बरोबर बुलढाणात आले होते. बुलडाण्यात आलेले हे लोकं त्रिशरण चौकात रस्त्याच्या कडेला पाल टाकून वास्तव्यास होते. बुधवारी मध्यरात्री सारे झोपी गेले असतानाच या रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे अचानक टायर फुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांच्या पालात शिरली. यात अनिल गंगाराम पडोळकर वय 29 वर्ष यांचा जागीच तर मायाबाई अनिल पडळकर वय 30 वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेबाबाई शेषराव सोळंके वय 35 वर्ष, आकाश अनिल पडोळकर वय 4 वर्ष, शेषराव लक्ष्मण सोळंके वय 40 वर्ष सर्व रा. पारधीबाबा मंदिराजवळ चिखली हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती बुलडाणा पोलिसांनी दिली. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना अकोल्याला हलविण्यात आल्याची माहिती आहे.