अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुराच्या वतीने केले ॲड. वामनराव चटप याचे अभिनंदन!
तिरूपति नल्लला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा:- राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली द्वारे दिला जाणारा “भारत ज्योती अवॉर्ड” ॲड. वामनराव चटप यांना जाहीर झाला असून दिनांक 09 एप्रिल 21 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन, त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
चटप यानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करताना कुठलीही सुरक्षा घेतली नाही. ते गेल्या चाळीस वर्षांपासून राजकिय व सामाजिक क्षेत्रात तसेच शेती व वकोली क्षेत्रात, आदिवासी बहुल भागातील गरजेचे प्रामुख्याने प्रश्न सोडविले, त्यांचा अनेक विषयात दांडगा अभ्यास असून. ते दोनदा संसदपट्टू सुद्धा राहिले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
यापुर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी. वाय. पाटील या दोघांनाच मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारे ॲड. वामनराव चटप हे महाराष्ट्रातून तिसरे व विदर्भातून पहिले व्यक्ती आहेत हे विशेष! तसेच जस्टिस फातिमा बिवी, जस्टिस पि. एन. भगवती, उस्ताद अमजद अली खान, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले अशा अनेक नामवंत लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा चे तालुका अध्यक्ष विनोद जि गेडाम, विदर्भ युवा सचिव महिपालजि मडावी, तालुका सचिव दिपक मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सीडाम, जिल्हा युवा संघटक विश्वेश्वर मडावी, युवा तालुका उपाध्यक्ष संतोष मडावी, जिल्हा युवा सचिव शुभम आत्राम उपस्थित होते.