महाराष्ट्र राज्यात 27,126 कोरोना रुग्णाची भर, महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात.

94

महाराष्ट्र राज्यात 27,126 कोरोना रुग्णाची भर, महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात.

 

27,126 corona patients in Maharashtra

नीलम खरात प्रतिनिधी✒
मुंबई,दि.20 मार्च:- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचे बांधीत रुग्ण मिळुन येत असल्याने शासन, प्रशासन आणि जनते मध्ये भीतीचे वातावरण दिसुन येत आहे. शनिवारी महाराष्ट्रात 27,126 नवीन कोरोना बांधित रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 24,49,147 झाली आहे. मागील काही दिवसांपासून काेराेना मृत्यूसंख्येतही वाढ हाेत असल्याचे समाेर येत आहे. आज राज्यात 92 काेराेना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज 13,588 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.97 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,91,006 कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.