Family reunion of Dhote family of Nalphadi held
Family reunion of Dhote family of Nalphadi held

नलफडीच्या धोटे कुटुंबियांचा कौटुंबिक मेळावा संपन्न

Family reunion of Dhote family of Nalphadi held

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा:- येथील धानोजे कुणबी समाज भवनात नलफडीच्या धोटे कुटुंबियांचा पारिवारिक मेळावा शिवराज धोटे व  रत्नाकर धोटे यांचे पुढाकाराणे दुपारी 12 ते 4 दरम्यान संपन्न झाला.

मूळ चे घाटकुळचे असलेल्या विठूजी धोटे कुटुंबीयातील अडाकू पाटील धोटे, कृष्णाजी धोटे, आणि जगन्नाथ धोटे राजुरा तालुक्यातील नलफडी येथे सहकुटूंब वास्तव्याला आले. तिथून त्यातील एकेक ब्रँच तोहोगाव, धानोरा, गोयेगाव, विसापूर असे रोजगार व शेती निमित्त विखुरले. पुढे राजुरा, सोंडो, दमण, नागपूर असा धोटे परिवार विखुरला.

या सर्वाना एकत्रित करण्यासाठी दमण येथे राहणाऱ्या मा रत्नाकर धोटे नी नागपूर येथे राहणाऱ्या शिवराज धोटे यांना कौटुंबीक मेळाव्याची कल्पना सांगितली. याचाच भाग म्हणून मा शिवराज धोटे यांनी घाटकुळ च्या धोटे कुटुंबाची वंशावळ तयार केली व आज कौटुंबिक मेळाव्यात पुस्तक रूपाने प्रकाशित केली.

धोटे कुटुंबाच्या कौटुंबिक मेळाव्यात आयोजकांनी धोटे कुटुंबातील जेष्ठाचा सत्कार केला. माझ्या सामाजिक कार्यातील योगदाना बद्धल माझा ही सत्कार केला व मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली.

धोटे कुटुंब मुळता शेतीशी निगडित असल्याने मी शेती, सिंचन, शिक्षण, सहकार्य, उद्योग व्यापार, उच्च पदावरील सरकारी नोकरी व व्यवसायात पुढाकार घेऊण स्वतःच्या प्रगती सोबत कुटुंब व समाजाची प्रगती साधण्यासाठी योगदान द्यावे असे मनोगत व्यक्त केले.

आगामी काळात असेच कौटुंबिक मेळावे नियमित घेऊण प्रगतीच्या वाटावर धोटे कुटुंबीय वाटचाल करतील ही अपेक्षा. शिवराजभाऊ रत्नाकर व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here