कोरोना रूग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जास्त रुग्णसंख्येच्या ठिकाणी लक्ष् केंद्रीत करा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग व लसीकरणचा वेग वाढवा, गरजेनुसार खाजगी रूग्णालयातून आवश्यक खाटांची पुर्तता करा

जिल्हा क्रिडा संकुलातील फुटबॉल मैदान व सिंथेटीक ट्रॅकचे काम लवकर करण्याचे निर्देश.

Pay attention to the management of Corona patients - Guardian Minister Vijay Vadettiwar
Pay attention to the management of Corona patients –

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 22 मार्च :- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून पुढील संभाव्य वाढ लक्षात घेता रुग्णांच्या उपचाराकरिता सर्व कोविड केअर सेंटरवर मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा तसेच गरज पडल्यास बाधीत रुग्णांकरिता खाजगी क्षेत्रातील रुग्णालयातून आवश्यक खाटांची पुर्तता करून कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोना उपाययोजनांचा आढावा तसेच जिल्हा क्रिडा संकुलच्या कामांचा आढावा आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई येथून घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकरी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृतती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, क्रिडा अधिकारी विनोद ठिकरे इ. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठकीला प्रमुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणले की कोरोना प्रतिबंधाकरिता बांधीतांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा जलद शोध घेवून तपासणीचे प्रमाण तसेच उपलब्ध लससाठ्यानुसार लसीकरणाचा वेग वाढविणेही गरजेचे असून ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येत आहे, त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना प्रतिबंधाकरिता विविध सुपरस्प्रेडरचे 39 गट पाडून तपासणी करण्यात येत असल्याचे तसेच ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ मोहिम व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हा क्रिडा संकुलातील कामे लवकर पुर्ण करण्याचे निर्देश

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी जिल्हा क्रिडा संकुलातील कामांचादेखील आढावा घेतला. क्रिडा संकुल येथे नव्याने तयार होत असलेले फुटबॉल मैदान, 400 मी. सिंथेटीक ट्रॅक व प्रसाधनगृहाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या ठिकाणी इंडोर गेम सुरू करण्याची व्यवस्था तसेच संरक्षक भिंतीलगत व्यापारी संकुलाचे बांधकाम करता येईल का याबाबत देखील चाचपणी करण्याचे सांगितले.

बैठकीला पोलीस उपअधिक्षक शेखर देखमुख, शिक्षणाधिकरी उल्हास नरड (माध्यमीक), दिपेंद्र लोखंडे (प्राथमिक), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.डी.मेंढे, राजेश नायडू, कुंदन नायडू, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here