चंद्रपूर शहर महिला काँग्रेस कमेटी च्या अध्यक्ष सौ सुनीता अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक 10 ची कार्यकारणी गठीत.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , आज दिनांक 22/3/2021 ला प्रभाग क्रमांक 10 मध्ये रहेमत नगर येथे वार्ड कमिटी घोषित करून वार्ड अध्यक्षांना पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सचिव नम्रताताई ठेमस्कर,ब्लॉक अध्यक्ष शितल कातकर,शहर उपाध्यक्ष उषा धांडे,नगरसेविका तथा शहर उपाध्यक्ष विना खनके,नगरसेविका तथा शहर उपाध्यक्ष सकिना अन्सारी व महिला काँग्रेसच्या सदस्या उपस्थित होत्या. यावेळी वार्ड अध्यक्ष म्हणून समरीन कमर देशमुख,अलमास अन्जुम अय्युब शेख,शाहिन परवीन सलीम खान,तबस्सु फिरोज पठाण यांना पत्र देण्यात आले.