15 lakh hall at Varazdi and land lease to the locals: MLA Subhash Dhote.
15 lakh hall at Varazdi and land lease to the locals: MLA Subhash Dhote.

वरझडी येथे 15 लाखाचे सभागृह आणि स्थानिकांना जमीनीचे पट्टे मिळवून देणार: आमदार सुभाष धोटे.

वरझडी येथे सल्ला शक्ती प्रतिकाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा :- राजुरा तालुक्यातील इसापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वरझडी येथे आदिवासी समजाचे सल्ला शक्ति प्रतीक बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते करण्यात आले. कोयाकुल कल्चरल डेव्हलपमेंट कमेटी मौजा वरझडी द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मूलनिवासी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासीं डोल, वाद्य आणि नृत्याच्या माध्यमातून स्वागत केले. गोंडी धर्मांचे संस्थापक परिकुपर लिंगो यांचा मार्गर्शनाखालीच सल्ला शक्ती (सल्लेर घागरा) चे प्रतिक आदिवासी गुड्यावर किंवा गावा गावात उभारली जाते. सल्लेर घागरचे उद्देश मातृशक्ती व पितृशक्तीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या शक्तीचे प्रतिक म्हणजे सल्ला शक्ती असे मानले जाते.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी वरझडी साठी १५ लक्षाचे सामाजिक सभागृह आणि प्रवाशी निवारा मंजूर करण्याचे आश्वसनही दिले. मूलनिवासी आदिवासी बांधवांना जमिनींचे पट्टे मिळवून देण्यात आपण आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले असून यापुढे सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प जाहीर केला. ते पुढे म्हणाले की आदिवासीं समजासाठी शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात पण अनेक मूलनिवासी बांधव योजनेचा लाभ घेत नाहीत. आदिवासी युवकांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मोठे अधिकारी झाले पाहिजे. बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, कुमराम भीम याचे विचार आणि आदर्शाचे पालन केले पाहिजे. विकासकामे कोण करतात, आपल्या सुख दुःखात सहभागी कोण होतात याची जाणीव ठेवली पाहिजे.

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच भिमराव सोयाम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, नगराध्यक्षा सविता टेकाम, जि प सदस्य डॉ. नामदेव करमरकर, माजी जि प सदस्य सीताराम कोडापे, उपसरपंच दिलीप डोईफोडे, नानाजी आदे, उपसभापती मंगेश गुरणुल, शामराव कोटनाके, प स सदस्य रामदास पुसाम, लींगु पाटील, आनंद मेश्राम, मुर्लीधर आत्राम, केशव कुळमेथे, किरांताई मडावी, भुजंगराव आत्राम, शामसुंदर आत्राम, सुधाकर सिडाम, साईनाथ सोयम, शत्रुगण मेश्राम गाव पाटील, आनंदराव दुर्वे गट शिक्षणा अधिकारी, दिलीप राहुत, विकास मडावी, अरविंद मेश्राम, जीभकाटे सर, तलांडे सर, कुंभारे साहेब अंबुजा फाउंडेशन विभागीय अधिकारी, गवकरी इत्यादी उपस्थित होते.

15 lakh hall at Varazdi and land lease to the locals: MLA Subhash Dhote.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here