बहुजन समाज पार्टी चद्रपुर शहर तर्फे बाबुपेठ इथे बैठकीचे आयोजन.

50

बहुजन समाज पार्टी चद्रपुर शहर तर्फे बाबुपेठ इथे बैठकीचे आयोजन.

 Bahujan Samaj Party Chadrapur city organizes a meeting at Babupeth.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,बहूजन समाज पार्टी च्या वतीने काल कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदेश सचिव व जिल्हा इन्चार्ज आदि चंद्रकांत मांझी साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, शहर उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, वॉर्ड अध्यक्ष राहुल कामटे, राजेश कुंभलवर सर यांचि उपस्थिती होती.

सदर बैठकीत चंद्रकांत मांझी साहेब यांनी सरफराज शेख यांची शहर महासचिव या पदावर नियुक्ती केली व बाबुपेठ सेक्टर अध्यक्ष या पदावर निखिल कवाडे, सेक्टर सचिव पदी कार्तिक वनकर/अमोल राहुलगडे, बाबुपेठ वॉर्ड अध्यक्ष या पदावर करन घोटेकर, तर वॉर्ड सचिव या पदावर विवेक दुपारे यांची नियुक्ती केली. या बैठकीत युवकांनी मोठ्या संख्येनी पार्टीत प्रवेश केला. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विमित कोसे यांनी केले.