हिंगणघाटमध्ये विवाहेतेचा छळ, पोलीस आरोपीला घालत आहे पाठीशी. मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन.
गृहविभाग करणार आरोपी परिवार आणि पोलिसावर कारवाई.
हिंगणघाट पोलिस गुन्हेगाराना घालत आहे पाठीशी.- पिढीत विवाहेतेचा आरोप
मिडीया वार्ता न्यूज टिम
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट मध्ये सासरच्या मंडळीकडुन अनेक वर्षा पासून वीवाहेतेचा छळ सुरु असतांना हिंगणघाट पोलिस स्टेशन मधिल काही पोलिस कर्मचारी आरोपी परीवाराला वाचवण्यासाठी जीवाच रान करत असल्याचे दिसून येत आहे. यांच महिन्यात प्रशासनाने जागतीक महिला दिन मोठ्या उत्साहात म्हनवण्यात आला. महिलाचा न्याय, हक्क आणि अधिकारावर मोठ मोठी भाषण दिली पण हिंगणघाट पोलिस विभागात चक्क आरोपीला वाचवण्यासाठी महिलावर दबाव आणत आहे. तिला बयाण देण्याचा नावावर 4 ते 5 दा पोलिस स्टेशनला बोलावण्यात येत आहे. परत परत बयाण घेण्यासाठी पोलिस तीला फ़ोन करुन बोलावत असल्याचे पिढीत महिलेने सांगीतलं. हिंगणघाट पोलिस तक्रार दाखल करुन नाही घेत म्हणून पिढीत विवाहित महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करवाई करीता निवेदन दिल होते. त्या निवेदनाचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयातुन परवा रात्री महिलेला आल. त्यात गृह विभागाला करवाईसाठी ते पाठवत असल्याचे त्यांनी त्यात नमुद केल आहे. आता गृह विभागाकडुन आरोपी परीवार आणि हिंगणघाट पोलिस विभागावर कधी पर्यंत करवाई होते यांची शहरात चर्चा सुरु आहे.
महिलेने दिलेल्या माहिती नुसार काही दिवसापुर्वी पिढीत महीलेच्या घरी आरोपी गेले आणि तिला मारपीत करुन तिचा विनयभंग करुन, जीवानिशी ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याने दि. 12 मार्च ला स्वता: पिढीत महीलेने हिंगणघाट पोलिस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. पण पोलीसांनी अजुन पर्यंत गुन्हा दाखल केला नाही. आणि आरोपींना अटक केली नाही. हिंगणघाट पोलिसांना या अगोदर पण लेखी स्वरुपात तक्रार दिली. पण हिंगणघाट पोलिसांनी त्या लेखी स्वरुपात दिलेल्या तक्रारीला कच-यांचा टोपलीत फेकून दिली. असा आरोप पिढीत महीलेने केला.
हिंगणघाट शहरांतील उच्चभु व्यवसायीक असलेले सुभाष चौक येथील सावरीया साडीचे संचालक प्रदिप गोवरधन राठी पती, गोवरधन राठी सासरे, उमेश गोवरधन राठी देर, दिलीप गोवरधन राठी देर यांच्या विरोधात प्रदिप राठी यांचा पत्नी प्रियंका प्रदिप राठी यांनी माझे सासरचे लोक माझा बरोबर गैर व्यवहार करतात. माझा सोबत क्रूर व्यवहार करतात. काही दिवसापुर्वी वाजता माझे सासरे गोवरधन राठी आणि देर उमेश गोवरधन राठी हे माझा घरी आले. त्यावेळेस मी आणी माझा मुलगा घरात असतांना मला जीवानीशी मारण्याची धमकी देत मला घर खाली करण्यास सांगीतल. व माझा हात पकडून त्यांनी ओढला ते यावरच थांबले नाही तर माझे सासरे गोवरधन राठी यांनी अगदी खालच्या भाषेत आश्लील भाषेत शिवीगाळ दिली.
पिढीत प्रियंका प्रदिप राठी यांनी दिलेल्या माहिती नुसार आज मी आणि माझा मुलगा घरात एकटी रहाते रात्री बेरात्री सासरची मंडळी घरी येऊन अश्लील शीवी देने जीवानीशी ठार मारण्याची धमकी देने असे नित्याने करत आहे. आता माझी सासरच्या कडुन छळ अत्याचार सहन करण्याची परीसीमा संपली आहे. आज यांनी मला काही केल तर माझा मुलच कस होईल हा विचार मला चुप बसू देत नाही आहे. त्यामूळे मी आज हिंगणघाट पोलिस स्टेशनला स्वताः उपस्थीत राहुन लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. पण हिंगणघाट पोलिस स्टेशन मधिल पोलिस कर्मचारी मला बयाण साठी परत परत बोलवत आहे. मी दिलेल्या लेखी तक्रारवर आरोपवर कारवाई करण्यापेक्षा पोलिस मलाच परेशान करत असल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतीक्रीया पिढीत प्रियंका प्रदिप राठी यांनी मिडीया वार्ता न्यूज ला दिली.