“राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन कोसारा येथील अनेक महिला पुरुषांनी स्वीकारले मनसेचे सदस्यत्व.”

58

“राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन कोसारा येथील अनेक महिला पुरुषांनी स्वीकारले मनसेचे सदस्यत्व.”

 "Inspired by the ideas of Rajsaheb Thackeray, many men and women from Kosara accepted MNS membership."

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:- शहरालगत असलेल्या कोसारा गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांनी आज दिनांक २१ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून पक्ष प्रवेश केला. सदर कार्यक्रम कट्टर महाराष्ट्र सैनिक शुभम वांढरे यांनी मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व विधानसभा सचिव महेश शास्त्रकार यांच्या नेतृत्वात आयोजित केला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार, जिल्हाउपाध्यक्ष राजू कुकडे, व महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनिताताई गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, मनवीसे तालुकाउपाध्यक्ष मयूर मदनकर, मनवीसे तालुकाउपाध्यक्ष करण नायर, शहर संघटक मनोज तांबेकर, वर्षा भोमले, महेश पिंपळकर उपस्थित होते.