आता आयटीआर भरण्यासाठी लागणार दंड
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
नवी दिल्ली, 1ऑगस्ट : – इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. आता आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी उशीरा दंड भरावा लागणार आहे. इन्कम टॅक्स इंडियाने या वेळी मुदत वाढवली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.