गणेशोत्सवात केळीच्या पानांना मागणी
आदिवासी महिलांच्या रोजगाराचे साधन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- गणेशोत्सवाच्या निमित्ताने दुर्गम भागातील महिलांना केळीच्या पानांनी रोजगार मिळवून दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला नैवेद्यासाठी आणि जेवणावळीसाठी केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे यंदाही केळीच्या पानांची मागणी वाढली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना यातून रोजगाराची संधी मिळते. गणेशोत्सवानंतर पितृपक्ष आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवातही या पानांना मोठी मागणी असते. त्यामुळे दोन महिने आदिवासी महिलांच्या रोजगाराचे महिने मानले जातात. पूर्वापार सणासुदीच्या काळात केळीच्या पानांचा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून केळीच्या पानांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी महिला जंगलात किंवा शेतांमध्ये जाऊन केळीची पाने गोळा करून त्यांची विक्री करतात. गोळा केलेल्या पानांचे भारे तयार केले जातात. एका भाऱ्यात साधारणपणे 40 ते 50 पाने असतात आणि त्याची विक्री 400 ते 500 रुपयांना केली जाते. गेल्या वर्षी हाच भारा 300 ते 350 रुपयांना विकला जात होता. पर्यावरणाला पूरककेळीचे पान हे पौष्टिक गुणधर्म असलेले पान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. केळीचे पान हे पर्यावरणपूरक असल्याने त्याचे विघटन होते