वृद्ध महिलेचा खून करून दागिने व मोबाईल लुटणाऱ्या आरोपी विरोधात माणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई..
काही दिवसातच माणगांव पोलिसांनी शिताफीने आरोप कल्पेश बबन जाधव याला केली अटक*
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड विभागीय प्रतिनिधी
📞89288 47695📞
रायगड :-माणगांव तालुक्यातील येरद गावात एका सत्तर वर्षीय संगीता मनोहर मोकाशी या वयोवृद्ध महिलेच्या घरात शिरून महिलेचा खून करून अंगावरचे दागिने व मोबाईल फोन लुटण्याची घटना १० मे रोजी घडली होती. माणगांव पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक शक्कल लढवून व तपासाच्या अनेक प्रयत्न करून आखेर २९ ऑगस्ट रोजी माणगांव पोलिसांना २५ वर्षीय आरोपी कल्पेश बबन जाधव ला जेरबंद करण्यास यश प्राप्त झाले.
१० मे रोजी आरोपी बबन जाधव हा राशन घेण्यासाठी येरद आदिवासी वाडीतून येरद गावात गेलेला मात्र राशन दुकान बंद असल्याने आरोपीने राशन समोरील घराचा दरवाजा ठोकला व पिण्यासाठी पाणी मागितले, ७० वर्षीय व्योवृद्ध महिला संगीता मनोहर मोकाशी या माणुसकी चा धर्म पाळत पाणी देण्यासाठी स्वयंपाक घरात जाताच आरोपीला सदरील महिला घरात एकटीच असल्याचे समजताच आरोपीने घरात घुसून वयोवृद्ध महिला च्या अंगावरचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला त्याविरोधात महिलेने प्रतिकार दिल्याने आरोपीने महिलेचा तोंड व गळा दाबून महिलेची हत्या केली व महिलेच्या अंगावरचे दागिने आणि मोबाईल फोन घेऊन लंपास झाला होता. पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचा एक कठीण आव्हान होता मात्र माणगांव पोलिसांनी काही दिवसातच सिसिटीव्ही फूटेज, गुप्तचर माहिती च्या आधारे शिफातीने माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपीला २९ ऑगस्ट रोजी अटक करून ३० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले, न्यायालयाने आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे. आरोपीला जर बंद करण्यात यशस्वी ठरणाऱ्या माणगांव पोलिसांची कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, सह पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस हवालदार भोनकर, फरताडे, घोडके, पोलीस शिपाई शिर्के,कांबळे, पाटील,मुंडे सह सर्व माणगाव पोलीस ठाणे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.









