नागपूर येथे नाबालीक मुलीवर सामूहिक बलात्कार.
प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप
नागपूर :- देशात आणी राज्यात आज महिला अत्याचाराचे प्रमाण खुप वाढत असल्याचे दिसुन येतं आहे. आज कुठलेही राज्य घ्या रोज नव नविन महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने १५ वर्षीय नाबालीग प्रेयसीवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नागपुर मधिल जरीपटका भागात उघडकीस आली. जरीपटका पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून प्रियकरासह चौघांना अटक केली आहे. प्रियकर यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार व ऋतिक मोहरले, अशी अटकेतील नराधमांची नावे आहेत.
पीडित १५ वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकते. यश मेश्राम याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. २५ ऑगस्टला यशने तिला नारा परिसरात नेले. झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच वेळी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके व ऋतिक मोहरले तेथे आलेत. त्यांनी यश याला मारहाण करण्याचा देखावा केला. त्यानंतर तिघांनाही मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर यशने प्रेयसीला घरी सोडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती दूध आणायला गेली. यावेळी अभिनेश हा तिला भेटला. तिला पुन्हा अत्याचाराची धमकी दिली. पीडित मुलगी घरी गेली. रडायला लागली. आईने तिला विचारणा केली. सामूहिक अत्याचाराची आपबिती तिने सांगितली. त्यानंतर आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. तिघेही यश याचेच मित्र असून यशनेच तिघांना तेथे बोलाविले होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे.