Home latest News वाशिम जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह

98

वाशिम जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; ११९ कोरोना पॉझिटिव्ह 
विनायक सुर्वे प्रतिनिधी
वाशिम :- जिल्ह्यात कोरोनाचा वायरस महामारीचा कहर सुरूच असून, आणखी दोन कोरोना वायरस बाधित रुग्णाची मृत्यू झाल्याची नोंद २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ११९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४२९५ वर पोहोचली आहे. दरम्यान मंगळवारी ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मृत्यू संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी यामध्ये आणखी ७६ रुग्णांची भर पडली. वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, नारायण बाबा चौक १, योजना पार्क १, पाटणी चौक १, सिव्हील लाईन २, पोलीस वसाहत परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, समर्थ नगर येथील १, लाखाळा येथील १, सुदर्शन नगर येथील १, गणेश नगर येथील १, कोल्हटकरवाडी परिसर १, पोलीस स्टेशन मागील परिसरातील १, काळे फाईल येथील २, शिक्षक कॉलनी परिसर १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर १, सीताराम नगर १, संतोषी माता नगर येथील १, जुनी आययुडीपी परिसर १, मोठा उमरा येथील १, तामसी येथील ८, अडोळी २, काटा येथील २, कार्ली २, ब्रह्मा १, शेलगाव १, देपूळ १, भटउमरा १, केकतउमरा येथील १, अनसिंग येथील १, गणेशपूर येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, गजानन नगर येथील १, आसनगल्ली येथील १, एकता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, गोवर्धन येथील १, धोडप येथील १, चिचांबाभर येथील १, करडा येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील १, शेंदूरजना येथील १, मालेगाव शहरातील ५, तरोडी २, जऊळका १, मारसूळ १, रेगाव १, शिरपूर जैन येथील १, मंगरूळपीर शहरातील ८, शेलूबाजार येथील १, मुतीर्जापुर १, वनोजा १०, जनुना येथील १, वार्डा येथील २, पाळोदी येथील २, गोलवाडी येथील १, मोझरी येथील १, चिंचखेडा येथील २, पिंपळखुटा येथील २, नागी येथील १, पिंप्री येथील १, सर्सी येथील २, कारंजा लाड शहरात ७, कामरगाव येथील ४, खेर्डा येथील ३, व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
वाशिम तालुक्यातील १ व मंगरूळपीर तालुक्यातील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे. दरम्यान
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आढळून आलेल्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत तसेच सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. गत दोन दिवसात घेतलेल्या नमुन्यांपैकी १८० जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.