जालन्यात घडली ऑनर किलिंग; विवाहित प्रेमी युगुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून केला खून.

61

जालन्यात घडली ऑनर किलिंग; विवाहित प्रेमी युगुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून केला खून.

प्रतिनिधी

जालना :- जिल्हात ऑनर किलिंग मध्ये विधवा सुनेची आणी प्रेमीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हात खळबळ माजली. अनैतिक संबंधांना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून व तिच्या प्रियकरास ट्रॅक्टरखाली चिरडून मारून टाकले. ही घटना बुधवारी सकाळी चापडगावच्या जलना जिल्हातील अंबड शिवारात घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
भागवत प्रल्हाद हरबक 27 वर्ष मारिया विनोद लालझरे 32 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

मारियाच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली आहे. भागवत लाल बावटा संघटनेचा चापडगावचा अध्यक्ष होता. बुधवारी संघटनेचा कुंंभार पिंपळगाव येथे मेळावा होता. त्यामुळे भागवतने काही जणांना घेऊन जाण्यासाठी दोन जीप व एक मालवाहतूक वाहन ठरविले होते. भागवतवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्याने तो व मारिया हे दोघे दुचाकीवरून क्र. एम.एच. 21- ए. के. 1977 मेळाव्याला गेले. पण दीड तासाने भागवतच्या दुचाकीला अपघात झाल्याचे त्याच्या कुटुंबियांना समजले. कुटुंबियांनी गंभीर अवस्थेत भागवत व मारिया यांना जालना येथील रुग्णालयात नेले. रस्त्यात जखमी भागवतने आई सीताबाई यांना सांगितले की, ‘विकास बथवेल लालझरे याने मुद्दाम ट्रॅक्टर आमच्या अंगावर घातला.’ भागवत व मारियाचा रुणालयात नेतानाच मृत्यू झाला.

भागवत व मारिया यांच्यातील संबंधांचा राग येऊन मारियाचा सासरा बथवेल याच्या सांगण्यावरून मारियाचा दीर विकासने दोघांचा खून केल्याची तक्रार भागवतची पत्नी राधा यांनी अंबड ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी भागवतच्या नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.