Home latest News प्रेम – लग्न आणी मर्डर मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना.

प्रेम – लग्न आणी मर्डर मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना.

88

प्रेम – लग्न आणी मर्डर मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

लॉकडाऊनमध्ये झाल प्रेम, ऑगस्टमध्ये झाल लग्न, आणी ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटून मर्डर

मध्य प्रदेश:- मधिल इंदोर शहरात एका नववीवाहित मुलीच्या गळा दाबून हत्या करण्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली. कोरोना वायरसच्या महामारीने सर्वत्र जनता त्रस्त असतांना एक प्रेम कहाणी फुलली. या लॉकडाऊनमध्ये तरुण तरुणी एकमेकांचे प्रेमात पडले. त्यानंतर ऑगस्टमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, मंगळवारी रात्री पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आपला गुन्हा कबूल केला.

ही घटना इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे कुटुंबातील वादातून नवविवाहित दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबला, नंतर चाकूने सपासप वार करून पत्नीची हत्या हत्या केली. पत्नी 22 वर्षीय होती. मृत पत्नीचे नाव अंशू असून तिचे कुटुंबीय तिचा पती व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप लावत आहेत. याशिवाय पोलीस सासरच्या दबावामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लगीनगाठ बांधली. अंशूच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. तर हर्षचे वडील राजीव हे स्टॉक ब्रोकर असून त्यांचं पालसिया येथे कार्यालय आहे.