Home latest News शिवसेना गोरगरिबांच्या मदतीला धावणारा पक्ष* *येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चा बाना दाखवा*...

शिवसेना गोरगरिबांच्या मदतीला धावणारा पक्ष* *येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चा बाना दाखवा* शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे शिवसैनिकांना सल्ला*

59

*शिवसेना गोरगरिबांच्या मदतीला धावणारा पक्ष*

*येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चा बाना दाखवा*

शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे शिवसैनिकांना सल्ला*

शिवसेना गोरगरिबांच्या मदतीला धावणारा पक्ष* *येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चा बाना दाखवा* शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे शिवसैनिकांना सल्ला*
शिवसेना गोरगरिबांच्या मदतीला धावणारा पक्ष*
*येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चा बाना दाखवा*
शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे शिवसैनिकांना सल्ला*

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335*

*अहेरी:*- शिवसेना पक्ष शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व गोरगरिबांच्या हिताचा विचार करणारा व सदैव मदतीला धावून जाणारा पक्ष असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण चे बाना दाखवा असा सल्ला शिवसैनिकांना देऊन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात रणशिंग फुंकले.
ते शनिवार 30 ऑक्टोबर रोजी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोर पोतदार होते तर उदघाटन स्थानी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख, उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉय, युवती सेना जिल्हा प्रमुख पायल गेडाम, अहेरी विधानसभा उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, जेष्ठ शिवसैनिक विलास ठोनबरे, युवा सेनेचे अहेरी विधानसभा प्रभारी दिलीप सुरपाम, युवती सेना अहेरी जिल्हाधिकारी तुळजा तलांडे, उप जिल्हाधिकारी अंकिता कन्नाके, युवती सेना अहेरी उपजिल्हाधिकारी निकहत शेख, शिवसेनेचे अहेरी तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, सिरोंचाचे अमित तिप्पटीवार, एटापल्लीचे किसन मट्टामी, एटापल्ली ग्रामीणचे तालुका प्रमुख मनीष दुर्गे, मूलचेरा येथील गौरव बाला, सिरोंचा येथील तालुका संघटक दुर्गेश तोकला, मीडिया सेलचे अहेरी विधानसभा प्रमुख उज्ज्वल तिवारी, बिरजू गेडाम, इंदूताई गायकवाड, यासिका इष्टाम, प्रेमीला मडावी, विलास पोचमपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलतांना किशोर पोतदार म्हणाले की, शिवसेना पक्षात शिवसैनिक सक्रिय राहून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे सदैव हित जोपासायला पाहिजे हिंदुह्रदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची स्थापणाच त्यासाठी केली असून आगामी व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण चे बाना दाखवून भगवा फडकवा असे म्हणत होऊ घातलेल्या नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी रणशिंगच फुंकले आणि विविध उदाहरणासहित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांनी, शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख नामदार उद्धवजी ठाकरे राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने मुख्यमंत्री पदी आरूढ होऊन उत्कृष्ट कार्य करीत असून शिवसेना पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक जागा मिळाल्यास जिल्ह्याचा विकास व कायापालट करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असे म्हणत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी शिवसेना पक्षाचे कार्ये व उद्दिष्टे सविस्तरपणे सांगून विलास कोडाप यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले.
तर याचवेळी अहेरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, देशात किंबहूना राज्यात शिवसेना पक्षाची एक वेगळी ओळख असून शिवसैनिक बेडर, जोमाने व दमदारपणे कार्य करून आतापासूनच पक्ष विस्तार व संघटनेच्या कामाला लागल्यास येणाऱ्या निवडणुकीत यश नक्कीच पदरी पडेल असा आशावाद व्यक्त करून आगामी निवडणूकासाठी सज्ज व्हा असा मौल्लीक सल्ला शिवसैनिकांना दिले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉय, किसन मट्टामी, दुर्गेश तोकला आदींनी पक्ष संघटनेविषयी विचार व्यक्त केले.
बैठकीचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे यांनी तर सूत्रसंचालन सुभाष घुटे यांनी केले. उपस्थितांचे आभार दिलीप सुरपाम यांनी मानले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सज्जू शेख, युवासेनेचे मनीष इष्टाम, महेश मोहूर्ले, भास्कर पानेम, अंकुश मंडलवार, संजय मंडल, मुकेश ठाकूर, निर्मला कन्नाके, रवी मेश्राम, राजू येनगंटीवार, सलिम शेख, राजू मामीडवार, अयान पठाण, हमजा शेख, बापू ठाकरे, शिवा मिरालवार, भानया दासरवार, अजय आत्राम, गजानन आत्राम, गणपती पानेम, राकेश गेडाम, राजेश गुंतीवार, तुषार शेंडे, रुपेश नुकूम, नागेश राजनलवार आदी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
*बॉक्स*
*जय भवानी , जय शिवाजी व आगेबडोच्या जयघोषणी परिसर दुमदुमले!*
आढावा बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकात मोठा उत्साह व जोश दिसून आले. मान्यवर मार्गदर्शन करतांना जुने मित्र पक्ष भाजपा पक्षाला चिमटा व तोंडसुख घेतांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आगे बडोच्या आणि शिवसेना पक्ष जिंदाबादच्या जयघोषणी परिसर दुमदुमले.