Home latest News शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे अनुदान तातडीने द्या शिवसेना तालुका...

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे अनुदान तातडीने द्या शिवसेना तालुका प्रमुख कैलास पाटील यांची मागणी

45

गोरे दत्ता 

लातुर प्रतिनिधी

दि.२५ लातूर ग्रामीण तालुक्यातील शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर योजना अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शिवसेनेच्या वतीने याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख मा श्री कैलास सुखदेव पाटील यांनी निवेदना द्वारे जिल्हाअधिकारी यांना दिला आहे या योजनेतून लहान व सीमांत शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी विहीर खोदण्यासाठी शासन १००% अनुदान देते सामान्य प्रवर्गाला ३ लाख तर SC/ST प्रवर्गाला ४ लाख रुपये मंजूर होतात शेतकऱ्यांनी विश्वासाने कर्ज काढून,उसने पैसे घेऊन विहिरी खोदल्या विहिरी पूर्ण झाल्या पंचायत समितीने तपासणी करून अहवालही दिले मात्र वर्ष उलटून गेले तरी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन विहीर खोदली आता सावकार दारात उभा आहे.

अनुदान रखडल्याने खरीप हंगामाच्या तयारीला पैसा नाही सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.अन्यथा पंचायत समितीवर ५०-१०० शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करू असा इशारा कैलास पाटील यांनी दिला यावेळी तालुका सचिव महादेव काळे विभाग प्रमुख विष्णू गायकवाड उपस्थित होते.