सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर कधी जाणार, कौस्तुभ करडे यांचा थेट सवाल
संतोष उध्दरकर
म्हसळा: मे महिन्या पासुन ते ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस काही थांबण्याचा नाव घेत नाही आहे.पावसापुढे कोकणातील शेतकरी पूर्णतः हतबल झाला असून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळाले. कोकणामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, परंतु या पावसाने कापणीला आलेला भात तसेच शेतकऱ्यांनी कापलेला भात पावसामुळे खराब झाला असून कोकणातील शेतकऱ्याची मेहनत पाण्यात गेली असुन वर्षाचे नुकसान झाले आहे. सत्ताधारी पक्ष, संघटना,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्यस्थ असून , पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू असून आपापसात चढाओढ करण्यात आनंद मानत आहेत, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नाही…सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे डोळे पुसणार का..?.. त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देणार का..? असा थेट सवाल म्हसळा युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी उपस्थित केला आहे.
आजची परिस्थिती पाहता म्हसळा तालुक्यांत जवळजवळ शेती करण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले असून अशा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेती केली आहे त्यांचे मनोबल खचले असून येणाऱ्या काळात जे काही शेतकरी शेती करत आहेत ते सुद्धा या नुकसानाने शेती करणे बंद करतील अशी काहीसी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने वेळीस पंचनामे सुरू केले असले तरी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणे तितकेच आवश्यक आहे.
शेतकरी हा बळीराजा फक्त यांना निवडणुकीपुरता वाटत असतो निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात असते. कोकणातील शेतकरी हा स्वाभिमानी व लढाऊ योद्धा आहे नुकसान झाले असले तरी शांतपणे सहन करून पुन्हा नव्याने उभा राहुन शेतीच्या कामात व्यस्थ होतो, शेतकऱ्यांचा सहन शक्तीचा अंत कोकणातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी पाहत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.असे कौस्तुभ करडे यांनी सांगितले.
शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब पक्ष शेतकरी बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.लवकरात लवकर रायगड जिल्ह्यातील,म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने नुसती मदत जाहीर न करता अंमलबजावणी करावी हीच प्रमुख मागणी युवासेना तालुका अधिकारी म्हसळा या नात्यानं सरकारकडे करत आहे हे –कौस्तुभ करडे, म्हसळा युवासेना तालुका अधिकारी.









