Home latest News सहज अन्नसेवा अभियानाचा 5 वा वर्धापन दिन साजरा… डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली...

सहज अन्नसेवा अभियानाचा 5 वा वर्धापन दिन साजरा… डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथील रुग्णांसाठी सातत्यपूर्ण सेवेचे 1461 दिवस परिपूर्ण…

68

सहज अन्नसेवा अभियानाचा 5 वा वर्धापन दिन साजरा…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथील रुग्णांसाठी सातत्यपूर्ण सेवेचे 1461 दिवस परिपूर्ण…

सहज अन्नसेवा अभियानाचा 5 वा वर्धापन दिन साजरा... डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथील रुग्णांसाठी सातत्यपूर्ण सेवेचे 1461 दिवस परिपूर्ण...

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय,खोपोली येथे तालुक्यातील विवीध भागातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येतं असतात.यात बहुतांशी आदिवासी व गरजू असतात.दवाखान्यापासून घर दूर असल्याने ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची बऱ्याच वेळा गैरसोय व तारांबळ लक्षात आल्याने सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातुन दोन वेळच्या जेवणाची निःशुल्क व्यवस्था दिनांक 01 जानेवारी 2019 पासून कार्यरत आहे.4 वर्षात किमान दहा हजार पेक्षा ज्यास्त जेवणाचे डबे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थेच्या माध्यमातुन पुरविण्यात आले.
01 जानेवारी 2023 रोजी सहज अन्न सेवेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या अन्नदात्यांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच पारिचारिका यांचा रायगड भुषण कृष्णा महाराज लांबे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयच्या मनीषा दिदी, प्रसिद्ध किर्तनकार विलास महाराज तांडेल, खोपोली बाराखडीचे अध्यक्ष दिनकर भुजबळ,वीरांगना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे,प्रसिद्ध उद्योजक हस्तीमल माणिकचंद यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला.
या उपक्रमाचे अन्नदाते म्हणुन डॉ.संगीता वानखेडे,डॉ. ऐश्वर्या गिरी, डॉ. श्रुती लांडगे,राखी गिरी,शैला उगले,अशोक ठकेकर,गणेश राक्षे, सचिन ओव्हाळ,राजेंद्र फक्के,हस्तीमल माणिकचंद,हस्तीमल ओसवाल,आशिष आंग्रे,सुहास कुंभार, समीर साठे,मोहिनी गुरव,वनिता साह,प्रदीप खंडेलवाल,संदेश येवले,ज्ञानदेव बीचकर,तौफिक कर्जिकर,केशरसिंघ राजपुत,शिल्पा मोदी,विलास पाटील,जयश्री कुलकर्णी, दलपत रावळ यांनी सत्कार मूर्ती म्हणून सन्मान स्वीकारला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, खजिनदार संतोष गायकर,महिला संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,मार्गदर्शक मोहन केदार,संघटक अखिलेश पाटील,मनोज जांगिड,परेश ठोंबरे, सचिन गवळी,योगिता जांभळे,नम्रता परदेशी, सलमान शेख,बंटी कांबळे, रोहित घोसाळकर,आयुब खान,सागरिका जांभळे,महेश मेश्राम,नकुल देशमुख,नोईम खान यांनी अथक परिश्रम घेतले.
आजच्या कार्यक्रमात पोपटलाल खंडेलवाल,डॉ. रियाझ पठाण, ग्यासउद्दिन खान,विजय गुरव,तुषार खोपे,राजश्री पाटील,रुपाली कुंटे, पूजा मॅडम,मनोज वडणेरकर,नरेंद्र हर्डीकर,किर्ती ओसवाल, श्रीपद महाडिक,फरीद शेख,राकेश ओसवाल,आकाश फक्के,रंजन चौधरी,सुजित महाडिक यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र फक्के व आभार इशिका शेलार यांनी मानले.

गरजूंसाठी अन्नसेवा ही काळाची गरज असुन अन्नसेवेत सहकार्य करणारे हात हे पुण्याचे प्रतीक आहेत.समाजाने सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याच्या या उपक्रमात भरभरून मदत करणाऱ्या कळत नकळत हातांना धन्यवाद देताना अध्यात्मातुन सामाजिक ऋण ध्यानात ठेवून मन:पुर्वक सेवा करा असा मौलिक सल्ला प्रख्यात किर्तनकार कृष्णा महाराज लांबे व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयच्या मनीषा दिदी यांनी दिला आहे.