अहेरी नगर पंचायत सफाई कामगारांना कपड्यांचे वाटप करून भाजपाने केला सन्मान..!!
भाजपा गडचिरोली जिल्हा प्रभारी आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य..!!

✍🏻अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
गडचिरोली : – भाजपा गडचिरोली जिल्हा प्रभारी आमदार मा.डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल भाजपा अहेरी तालुका तर्फे स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहेरी नगर पंचायतच्या सर्व सफाई कामगारांना साडी चोळी, लुगडं, टी शर्ट, दुप्पटे आणि त्यांना मिठाई देऊन त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला, तसेच सफाई कामगारांच्या सुख दुःखात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी ह्यावेळी दिले..!!*
*ह्यावेळी जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती दिपाली नामेवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, शालीनी पोहणेकर, लक्ष्मी मद्दीवार, विकास उईके, माजी नगराध्यक्षा हर्षा ठाकरे, प्राजक्ता पेद्दापल्लीवार, प्रशांत ढोंगे, तालुका महामंत्री मुकेश नामेवार, शँकर मगडीवार, संजय अलोने, नितीन गुंडावार, गुरुदास मडावी,नारायण सिडाम, दिलीप पडगेलवार,प्रशांत नामनवार, गुड्डू ठाकरे, सुचित कोडेलवार सह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!*








