Home latest News लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी विद्रोही पत्रकार प्रविण तायडे यांची...

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी विद्रोही पत्रकार प्रविण तायडे यांची निवड सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव

75

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी विद्रोही पत्रकार प्रविण तायडे यांची निवड

सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी विद्रोही पत्रकार प्रविण तायडे यांची निवड सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -9860020016

सिल्लोड : – लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक -अध्यक्ष सचिन बोंबले यांनी लोकशाही मराठी पञकार संचाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी “साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे” एक विद्रोही कार्यकारी संपादक तथा औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण तायडे यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार त्यांना बढती देऊन त्यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदावर निवड केली असून त्यांचे लोकशाही मराठी पञकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष सचिन बोंबले, राज्याचे कार्याध्यक्ष अमोल पाटील,राज्याचे सचिव संग्राम पाटील,मराठवाडा विभागीय अध्यक्ष दशरथ एन सुरडकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख जयश्री सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ,आकाश सोनवणे,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय पाटील विदर्भ प्रदेश अध्यक्ष मनोज खोब्रागडे, जालना जिल्हा अध्यक्ष विजय खरात,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे,जळगाव जिल्हा अध्यक्ष विष्णू मोरे,धरणगावं तालुका अध्यक्ष महेंद्र चौधरी,पाचोरा तालुका अध्यक्ष, शेख जाविद,सोयगाव तालुका अध्यक्ष, गोकूळसिंग राजपूत, मेहुल बर्डे,सिल्लोड तालुका प्रसिद्धी प्रमुख जमील मिर्झा,सोयगाव तालुका पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, फरदापुर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, देवगाव रंगारी,पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे,धरणगाव तालुका,पोलिस स्टेशन चे राहुल खताळ,विविध राजकीय पक्षाच्या नेते,पदाधिकारी, समाजसेवक, सरपंच,पोलिस पाटील,तहसीलदार, गटविकास अधिकारी, अधिकारी वर्ग, यांनी सदर निवडीचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*प्रविण तायडे आहे तरी कोण.?*
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापुर येथील रहिवासी असून एक प्रेमळ,विद्रोही विचारचा सच्चा माणूस. अजिंठा बुद्ध लेणीमध्ये ते कंट्राटी तत्वावर नोकरी असून एक उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची सुरुवातीची ओळख.पत्रकारीता म्हणजे त्यांचे‌ कोणतेच नाते नव्हते. वंचित बहुजन आघाडीचे सोयगांव तालुका उपाध्यक्ष पदावर ते काम करायचे.
त्यांची आणि साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ.एन.सुरडकर यांची त्यांची सोशलमीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तेव्हा दशरथ.एन.सुरडकर यांनी त्यांच्या कार्याची दखल‌ घेऊन त्यांना पत्रकारीता क्षेत्रात येण्याचा व पत्रकारीता करण्याचा सल्ला दिला त्यावेळी प्रवीण तायडे यांनी स्पष्ट नकार देत सांगितले की मला पत्रकारिता करता येणार नाही असे सांगितल्यावर दशरथ.एन.सुरडकर यांनी सांगितले की मी बाकी सर्व‌ बघून घेईल‌ फक्त हो म्हणा अशी उर्जा दिल्यावर प्रविण तायडे हे पत्रकारिता क्षेत्रात येऊन तीन वर्षात त्यांनी आपल्या दैनिक बुलंद शक्ती, दैनिक लोकनायक आणि आता साप्ताहिक आपले ज्ञानपंख या वृत्तपत्राच्या माध्यमातून चांगली पत्रकारीता करुन‌ आपले विद्रोही लेखन करुन नाव उज्वल केले. अशा या अष्टपैलू विद्रोही पत्रकार प्रविण तायडे यांची लोकशाही मराठी पञकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी निवड झाली ख-या अर्थाने ते पदास पात्र ठरले प्रविण तायडे हे भविष्यातील पत्रकारिता क्षेत्रातील व‌ लोकशाही मराठी पञकार संघाचे महाराष्ट्राचे एक ब्रँड असणार असल्याचे आज तरी चित्र दिसत आहे. त्यांच्या निवडीचे राज्यभरातून पत्रकार व लोकशाही मराठी पञकार संघ, राजकीय, सामाजिक, शासकीय निमशासकीय व्यापारी व मित्रपरिवार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.