Home latest News माणगांव मध्ये विद्युत खाबांची आडकाठी

माणगांव मध्ये विद्युत खाबांची आडकाठी

62

माणगांव मध्ये विद्युत खाबांची आडकाठी

माणगांव मध्ये विद्युत खाबांची आडकाठी

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
संपर्क ८०८००९२३०१

माणगांव :- माणगांव नगर पंचायत हद्दीत सत्ता झाल्या नंतर माणगांव नगर पंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी विकासकामात धडाका लावला आहे. यंदा शहरांत पुरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गटारे नाले याची साफसफाई करून गटार नाली उंच केली आहे मात्र मोर्बा रोड वर अल्फा हॉस्पिटल शेजारी विद्युत खांब नाल्यावर असल्यामुळे गटार नाल्याची खोली वाढविता आली नाही परिणामी या भागात पाणी साचण्याची घटना घडली आहे.

२९ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास पावसानी हजेरी लावल्याने मोर्बा रोड येतील अल्फा हॉस्पिटल परिसरात वालेराव ते डोंगरे याच्या निवासकडील रस्त्याचा भाग पाण्याखाली गेला होता रात्री १० च्या सुमारास या परिसरात गुडघाभर पाणी साचला होता. माणगांव नगर पंचायत तर्फे यंदा शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी खबरदारीं घेण्यात आली आहे मात्र हा परिसर अपवाद ठरला असून येते पाणी साचण्याचे वेगळे कारण आहे या ठिकाणी नव्याने गटार बांधून त्याची खोली वाढविण्यात येणार होती तसेच नाला दुरुस्ती करण्यासाठी त्याची खोली वाढविण्यासाठी जेसीबी आणण्यात आला होता गोद नदीपर्यत नाला खोदण्याचे प्रयोजन होते मात्र दुर्दैवाने याठिकाणी महावितरणच्या असलेल्या विदयुत खाबाने घोळ घातला या विद्युत खाबामुळे नाला खोदतां आला नाही त्यामुळे पाणी जाण्यासाठी अडचण होत असून महावितरण याने विद्युत खांब हळवावा जेणेकरून नाले खोदाई करून पावसाचे पाणी नदीपर्यंत जाण्यास सोपं होईल.