स्वप्निल चौधरी याला राष्ट्रीय किक बॉक्सिंगमधे कांस्यपदक, आ.समिर कुणावार यांनी केला सत्कार.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट दि.०१ ऑक्टोबर:- स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी युवक स्वप्निल राजू चौधरी याने किक बॉक्सिंग या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळविल्याबदल आज दि.१ रोजी त्याचा स्थानिक आमदार समिर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार समिर कुणावार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कोणत्याही आवश्यक प्रसंगी मदतीचे आश्वासन दिले. स्वप्निल राजू चौधरी याने राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळविले आहे.

मोपासा (गोवा) येथे २६ ऑगस्ट 2021 रोजी १९ वर्षे वयोगटातील स्पर्धेमधे त्याने यश संपादन केले आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस, अंकुश ठाकूर , नगरसेवक प्यारूभाई कुरेशी, भाजपा महामंत्री सुभाष जी कुंटेवार,भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्वत, सोनू पांडे, अतुल नंदागवळी, स्वप्नील जी शर्मा, स्वप्निल सुरकार, बाळू वानखेडे, दिनेश वर्मा, अनिल गहेरवार इत्यादी कार्यकर्ते सत्कार समारोह कार्यक्रमा करीता उपस्थित होते.