आंध्र प्रदेश ब्रेकिंग
भद्राद्री कोतागुडेम
उत्पादन शुल्क आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी भद्राचलममध्ये मोठ्या प्रमाणात केला गांजा जप्त ।

✍🏻अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
अहेरी उपजिल्हा :- भद्राद्री कोतागुडेम
उत्पादन शुल्क आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी भद्राचलममध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला.
ओडिशातून हैदराबाद ला भद्राचलम मार्गे नेण्यात येत असलेल्याची सूत्रान कडून माहिती मिळाली असता सापळा रचुन भाजीपाल्याच्या ट्रॉलीमध्ये नेत आसलेला गांजा जप्त करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी 58,65,000 रुपये किमतीचा सुमारे 391 किलो गांजा जप्त केला.
लाल कांद्याच्या ट्रॉलीमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क पोलिसांनी अटक केली असून भद्रादि येथील पोलिस पुढील तपास करत आहे








