Home latest News सातगावला वखरटी सुरू असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने बैल ठार शेतकरी...

सातगावला वखरटी सुरू असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने बैल ठार शेतकरी बालंबाल वाचल

67

सातगावला वखरटी सुरू असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने बैल ठार

शेतकरी बालंबाल वाचल

सातगावला वखरटी सुरू असताना इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागल्याने बैल ठार शेतकरी बालंबाल वाचल

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील बापू आनंदा पवार यांच्या मालकीचा ६० ते ७० हजार रुपये किमतीचा बैल इलेक्ट्रिक पोलचा शाॅकच्या धक्क्याने जागीच ठार झाला.

सविस्तर असे की बापू आनंदा पवार यांची बैलाची जोडी सव्वा लाखाच्या किंमतीची होती. स्वतःच्या शेतातील कामे आटोपून घर खर्चा करीता दुसऱ्याच्या शेतावर रोजंदारीने औत नेत असायचे. ता ३ रोजी गावातीलच मोहन पुंडलिक बच्छे यांच्या शेतात रोजंदारीवर पवार हे वखरणी करत होते. यावेळी पवार पाणी पिण्यासाठी बसले असता. त्यावेळी मोहन पुंडलिक बच्छे यांचा मुलगा रघुनाथ बच्छे याने वखरणी सुरू केली वखरणी सुरू असतानाच इलेक्ट्रिक खांबाजवळून जात असताना अचानक बैल कोसळला. लोखंडी वखर असल्याने रघुनाथ बच्छे यांनाही जोरदार शाॅक लागून ते कसेतरी निसटले आणि बालंबाल वाचले. दुसरा बैलही निसटला. त्यामुळे शेतकरी आणि एक बैल वाचला. “काळात तेरावा महिना” या प्रमाणे बापू पवार यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. चांगला बैल गेल्याने इतर शेतकऱ्यांनाही हळहळ वाटली. सदर इलेक्ट्रिक पोलवर सिक्युरिटी सोल्युशन बसवण्यात न आल्याने पोलला दिलेल्या तानाच्या तारेमधून विद्युत उतरल्याने सदर घटना घडल्याचे शेतकऱ्यांने म्हटले आहे. झालेल्या नुकसानीस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याने नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी बापू पवार या शेतकऱ्याने यांनी केली आहे.