नवाब मलिक यांची कोठडीतून सुटका नाही, न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत कोठडीत केली वाढ

सिद्धांत
४ एप्रिल, मुंबई: राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना पैश्याच्या अफरातफरी प्रकरणात अटक केल्यानंतर आज विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्या कोठडीत दोन आठवड्यानी म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री असलेले नवाब मलीक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली ईडीने त्यांच्या घरावर धाड मारली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारीला त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्या कोठडीत वाढ केली गेली असल्याने रमजानचा सण नवाब मालिकांना कोठडीतच साजरा करावा लागणार आहे.
हे आपण वाचलंत का?
- शेतकऱ्यांचा शोषन करणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय चुप बसणार नाही, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
- श्रीलंकेमध्ये नक्की चाललंय तरी काय? एक लिटर दूध मिळतंय २ हजार रुपयाला
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नवाब मालिकांच्या अटकेला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात येत होता. परंतु नवाब मलिक यांची अटक हि कायद्याला धरून आणि योग्य नियमांचे पालन करूनच झाली असल्याचे मुंबई न्यायालयाने सांगितले होते. दाऊद टोळीशी संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर संशयास्पद जमिनेचे खरेदी-विक्री व्यवहार केल्याच्या आरोपाखाली नवाब मालिकावर वरील कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान कोठडीत असताना घरचे जेवण, बेड अंथरून आणि औषधें यांसारख्या सुविधा नवाब मलीक यांना पुरवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.