Home latest News शेतकऱ्यांचा शोषन करणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय चुप बसणार नाही माजी मुख्यमंत्री...

शेतकऱ्यांचा शोषन करणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय चुप बसणार नाही माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकास निधीची अडवणूक करण्याचे पाप करीत आहे राज्य शासन – — आमदार बंटीभाऊ भांगडीया नागभीड येथील स्वागत कार्यक्रमात हजारो भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती

99

शेतकऱ्यांचा शोषन करणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय चुप बसणार नाही
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकास निधीची अडवणूक करण्याचे पाप करीत आहे राज्य शासन – — आमदार बंटीभाऊ भांगडीया

नागभीड येथील स्वागत कार्यक्रमात हजारो भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती

शेतकऱ्यांचा शोषन करणाऱ्या राज्य सरकारला धडा शिकवल्याशिवाय चुप बसणार नाही माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकास निधीची अडवणूक करण्याचे पाप करीत आहे राज्य शासन - -- आमदार बंटीभाऊ भांगडीया नागभीड येथील स्वागत कार्यक्रमात हजारो भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड-गडचिरोली येथे राज्य सरकारच्या विरोधात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भव्य मोर्चाचे नेतृत्व करीत असतानाच्या प्रवासात आमदार बंटी भांगडिया यांच्या विनंतीला मान देऊन थांबले असता त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या हस्ते माने देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते मर्निंग वाक संघटनेला पाच लाख रुपये चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच चौडेश्वरी माता मंदिर बांधकामासाठी आर्थिक साहाय्य म्हणून सुद्धा फडणीस साहेबांच्या हस्ते धनादेश देण्यात आला . चेक वाटप करण्यात आल्यावर देवेंद्रजी फडणीस यांनी सांगितले की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे एकही प्रश्न सोडवत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत असून फक्त भ्रष्टाचाराच्या कामात व्यस्त असून या राज्य सरकारला पायउतार केल्याशिवाय चूप बसणार नाही असे आवाहन केले.

नागभीड येथील श्री राम मंदिर चौकात भाजप तालुका नागभीड यांच्या वतीने स्वागत कार्यक्रम आयोजित केले असता या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार चंद्रकांत बावनकुळे, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर , भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे ,भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार ,भाजप नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके, चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, सभापती अवेश पठाण, सचिन आकुलवार, गुलजार धम्मानी, चिमूर भाजप तालुका महामंत्री प्रशांत चिडे, महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, माजी जी ,प सदस्य डॉ देवनाथ गंधारे, माजी सभापती प्रकाश वाकडे, नगरसेवक वानखेडे, प्रवीण गणोरकर, विनोद चोखरे, अवि बारोकर, संदीप पिसे, निलेश गभने, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले ,असिफ शेख , धनराज बावनकर बुथ प्रमुख, भोजराज नवघडे,तसेच पञकार संघाचे पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते,आदी ,विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याचे फटाक्याच्या आतिषबाजी व वाद्याच्या गजरात भव्य स्वागत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे हस्ते झाले.

याप्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की राज्याचे सरकार चिमूर विधानसभा क्षेत्रातील मंजूर प्राप्त विकास निधी अडवणूक करण्याचे पाप करीत असल्याचे सांगत आपल्या क्षेत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन मध्ये विकास कामे खेचून आणण्याची ग्वाही दिली.

यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.मोटार सायकल रॅली काढण्यात आली.