महानिर्मिती कोराडी ने घेतली दखल कोविंड सेंटरचा शुभारंभ

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
कोराडी:- महादुला येथे दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच बेड अभावी मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. करिता बंद असलेले स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार तरी कधी या मथळ्याखाली वर्तमान पत्रात छापून आले होते आले होते. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांच्या उषा रघुनाथ शाहू, रोशन इंदुरकर, राष्ट्रगान चंद्रशेखर, पवित्र मेश्राम यांनी सदर मागणी लावून धरली होती. अखेर महानिर्मिती कोराडी वृत्ताची दखल घेऊन पाठ पुराव्याअभावी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज शालिनीताई मेघे रुग्णालय सेंटर वानाडोंगरी हिंगणा रोड नागपूर यांच्यातील सामंजस्य करारानुसार महानिर्मिती कोराडी च्या स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये 20 खाटांचे को वेड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानिर्मिती मराठी वसाहत महादुला व इतर भागात प्रत्येक रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रूग्णालय ऑक्सिजन व बेड उपलब्ध व्हावा याकरिता रुग्णालय नातेवाईकांना नागपुरात भटकंती करावी लागत होती. त्यामुळे कोराडी व महादुला येथे मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत होता. यामुळे तात्काळ उपाययोजना म्हणून मागील चार वर्षापासून बंद असलेला स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकारी यांनी ऑक्सिजन बेड व इतर सामुग्री उपलब्ध करून दिली आहे. आजारावर उपचारासाठी स्वामी विवेकानंद इतर आजारावरील उपचारासाठी स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात यावे अशी मागणी भूषण चंद्रशेखर यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हॉस्पिटलमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी महानिर्मिती कुर्हाडीचे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्याचे आभार व्यक्त केले आहे.








