Home latest News वर्धा जिल्हाला 10 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन द्या. आमदार...

वर्धा जिल्हाला 10 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन द्या. आमदार समीर कुणावार यांचे केंद्रीय मंत्री  गडकरी यांना निवेदन.

74

वर्धा जिल्हाला 10 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन द्या. आमदार समीर कुणावार यांचे केंद्रीय मंत्री  गडकरी यांना निवेदन.

आमदार समीरभाऊ कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यासाठी 10 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा तातडीने केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून वाढवून देण्याबाबतचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन.

वर्धा जिल्हाला 10 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन द्या. आमदार समीर कुणावार यांचे केंद्रीय मंत्री  गडकरी यांना निवेदन.
वर्धा जिल्हाला 10 मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन द्या. आमदार समीर कुणावार यांचे केंद्रीय मंत्री  गडकरी यांना निवेदन.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
वर्धा/हिंगणघाट,दि.4 मे:- कोरोना काळात सर्वत्र प्राणवायुची टंचाई निर्माण झाली असून यातून वर्धा जिल्हासुद्धा सुटला नाही. जिल्ह्यातील प्राणवायु म्हणजेच ऑक्सीजन साठयाची निकड पहाता हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दूरदृष्टिकोण बाळगत केंद्रीयमंत्री ना.नितीनजी गडकरी यांना 10 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

र्धा जिल्हयात सर्वत्र कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाबाधितांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन वायु हा मोठा घटक आहे.यामुळे 10 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा तातडीने केन्द्र सरकार कडुन किंवा राज्य सरकारकडुन वाढवून देण्याबाबत नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.

वर्धा जिल्हयासाठी 16 मॅट्रिक टनाचा ऑक्सिजनचा कोटा हा ऑक्सिजनसाठा अतिशय अपुरा असा आहे. उपरोक्त 16 टन ऑक्सिजन साठा हा सावंगी (मेघे) रुग्णालयास व सेवाग्राम रुग्णालयासाठी आहे. हिंगणघाट,समुद्रपूर आणि आर्वी, वर्धा येथे खाजगी कोविड सुश्रुषागृहे उभारण्यात आली असुन ऑक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने त्यांना कोरोनाबाधितांना सेवा देणे शक्य नाही. ऑक्सीजन तूटवडयामुळे शेकडो कोरोनारुग्णाना वैद्यकीय यंत्रणा तयार असतांनासुद्धा ऑक्सिजनअभावी वंचित राहावे लागत आहे. अपुऱ्या ऑक्सिजनपुर्ततेमुळे आता जिल्ह्यात जिवितहानी होत आहे. जर ऑक्सिजन कोटा वाढवून दिला तर खाजगी रुग्णालयेसुध्दा तात्काळ सेवेत रूजू होऊन अश्या कठिणसमयी आपली सेवा देवू शकणार आहे.

समुद्रपूर तालुक्यामध्ये 50 खाटांचे खाजगी कोव्हीड रुग्णालय कोरोना बाधितांच्या उपचारासाठी तयार आहे. परंतु ऑक्सिजन साठया अभावी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापपावेतो परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत आमदार समिर कुणावार यांनी परिस्थितिचे गांभीर्य ओळखून नितीन गडकरी यांचेकड़े अतिरिक्त 10 टन ऑक्सिजन साठा वाढवून देण्याची मागणी केली असून सोबतच हिंगणघाट विधान सभेसाठी 20 ऑक्सिजन Concentrator देण्याची सुद्धा मागणी याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.