मौजे हुस्सा येथील काशी तीर्थ यात्रा दर्शन केलेल्या भाविकांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमात आमदार राजेश पवार यांच्या ऐवजी त्यांच्या सुपुत्रावर भागविला कार्यक्रम….
अशोक वाघमारे.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मो 80108 74742
नांदेड :- नायगाव मतदार संघातील मागील आठवड्यामध्ये हजारो भाविकांनी काशी तीर्थ दर्शन यात्रा आमदार राजेश पवार यांच्या संकल्पनेतून केले आहे. त्याच अनुषंगाने हुस्सा येतील एकूण 52 भाविकांनी काशी तीर्थ दर्शन यात्रा केले असल्याने हुस्सा येथील भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन श्री हनुमान मंदिर यांच्या मैदानात करण्यात आले होते. याच कार्यक्रमाला आमदार राजेश पवार यांचे उपस्थिती असे काही कार्यकर्त्याकडून वल्गना करण्यात आले होते. मात्र त्यांच्या अनुपस्थित व आमदार राजेश पवार यांचे सुपुत्र यांच्या उपस्थितीत संपन्न करावा लागला आहे. यामुळे गावातील अनेक नागरिकांचे व भाविकांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे.
सदर कार्यक्रम गावातील भाविकांनी महाप्रसादाच नियोजन केले असून याच कार्यक्रमाला आमदार राजेश पवार यांची उपस्थिती हे अपेक्षित असताना आमदार राजेश पवार यांनी मात्र सदर कार्यक्रमाकडे दांडी मारली आहे. आमदार पवार यांच्या दांडीमुळे गावातील काही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुसफुस असल्याचे दिसून आले आहे. सदर कार्यक्रम हा भाजपचा झाले नसल्याचे काही कार्यकर्त्याकडून सांगण्यात आले आहे तर हा कार्यक्रम राजेश पवार यांच्या समर्थकाचा असल्याचे गावातील काही नागरिकांमध्ये चर्चा झाल्याची दिसून आले आहे. आमदार राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघातील हजारो भाविकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवून आणले आहे हे तीर्थ दर्शन यात्रा जरी स्वखर्चाने झाली असली तरी विविध गावांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या मिरवणुकीसाठी व अन्य खर्च हा भाविकांकडून केले जात आहे हे मात्र तेवढेच खरे आहे. आमदार राजेश पवार यांनी तीर्थ दर्शन यात्रा मतदारसंघातील भाविकांना घडवून आणले तेवढेच मतदार संघातील भाविकांना व मतदारांना भावनिक सात घालण्याचा देखील प्रयत्न होताना दिसून येत आहे. गावातील धार्मिक कार्यक्रमात राजकारण करू पाहणारे आमदारांना आगामी काळात मतदारांनी कितपत साथ देतील हे मात्र बघणे औचुक्याचे असणार आहे. आमदार पवार यांच्याकडून मतदारांना भावनिक साधून व मतदारांना संभ्रम अवस्थेत टाकत असल्याचे मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान येत आहे. नायगाव मतदार संघातील भाजप गटबाजी मुळे आगामी विधानसभेमध्ये आमदार राजेश पवार यांची मोठी कोंडी होईल का असे प्रयत्न केले जात असता. एकीकडे राजेश पवार यांचा एक कलमी कार्यक्रम चालू असताना दुसरीकडे मात्र मतदारसंघात भाजप निष्ठावंत कार्यकर्ते नेते हे एकजुटीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप मधूनच राजेश पवार यांना घेरण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असतात त्याचेच पडसाद हुस्सा गावामध्ये देखील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते मध्ये असल्याचे दिसून आले होते. उपस्थित कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आमदार राजेश पवार यांचे सुपुत्र शिवाजी दादा पवार, हुस्सा येथील सरपंच प्रतिनिधी रमेश रामराव माली पाटील, आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक बाबासाहेब पाटील हंबर्डे,साहेबराव पाटील देगावे, गोविंद गणेश पाटील हंबर्डे यासह आमदार राजेश पवार मित्र मंडळ हुस्सा व महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.