Home latest News सरदार पटेल महाविद्यालयाला १० पुरस्कार

सरदार पटेल महाविद्यालयाला १० पुरस्कार

142

सरदार पटेल महाविद्यालयाला १० पुरस्कार

सरदार पटेल महाविद्यालयाला १० पुरस्कार

• महाविद्यालयाने राखली यशाची परंपरा कायम

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर 4 ऑक्टोंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयाला गोंडवाना विद्यापीठाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह १० पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान विद्यापीठाच्या निकालात पाच विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. या सर्वांना नुकतेच गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापनदिन व दीक्षांत समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सरदार पटेल महाविद्यालयाला गोंडवाना विद्यापीठाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह १० पुरस्कार मिळाले आहेत. उत्कृष्ट एनसीसी अधिकारी म्हणून कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके यांना पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार हा समीक्षा आंबटकर हिला मिळाला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला गोंडवाना विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट एकक पुरस्कार मिळाला. एनएसएस समन्वयक डॉ. कुलदीप आर. गोंड यांना चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, तर दर्शन मेश्राम ला चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक विभागातून चांदनी धनकर ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. गोंडवाना विद्यापीठ द्वारा उत्कृष्ट शिपाई म्हणून दशरथ कामतवार याला सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात देखील महाविद्यालयाला ‘जनरल चॅम्पियनशिप’ मध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला, तर ‘शब्दगंधा’ या वार्षिकांकाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.