वेकोलीच्या क्षेत्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : राजेश बेले

111

• कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य उघड्यावर जाळले

• महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व चंद्रपूर मनपाची वेकोली ला कारणे दाखवा नोटीस

चंद्रपूर, 4 डिसेंबर : लालपेठ येथील वेकोलीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या आवारात कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य उघड्यावर जाळण्यात आले असून याविरोधात पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी वेकोलीच्या क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रुग्णालयाच्या आवारात कालबाहय झालेल्या औषधी व काही वैद्यकीय साहित्य उघडपणे जाळल्यामुळे वातावरणात घातक रासायनिक वायू मिश्रीत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाल्याचा आरोप

पर्यावरणवादी राजेश बेले यांनी केला. वेकोलिचे प्रादेशिक महाप्रबंधक, प्रादेशिक वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी, चंद्रपूर क्षेत्र यांच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता लेखी तक्रार दाखल केली आहे. राजेश बेले म्हणाले कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य उघड्यावर जाळण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचून मानवी जीव, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, जलजन्य प्राणी व पक्षी यांच्या संरक्षण कायद्याचे उल्लंघन वेकोलीने केले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वेकोलीला कारणे दाखवा नोटीस दिली १५ दिवसाच्या आत उत्तर मागविण्यात आले आहे.

तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने वेकोली रूग्णालय, लालपेठ यांना कालबाहय औषधी व वैद्यकीय साहित्य जाळले असल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्या संबंधात नोटीस बजावून ४८ तासाच्या आत वेकोलीला जाब विचारला आहे.

वेकोली चंद्रपूर लालपेठ रुग्णालयाच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, नियमानुसार समिती अधिकृत जल प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा १९७४ च्या कलम २५/२६ अंतर्गत स्थापित चलीत हवा प्रदुषणाची तरतुद आणि नियंत्रण कायदा १९८१आणि धोकादायक वेस्ट व्यवस्थापन आणि हाताळणी नियम १९८९आणि सुधारीत नियम २०१६ च्या पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाले आहे यामुळे कायदेशीर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चंद्रपूर शहर, पोलीस निरिक्षक यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राजेश बेले यांसह इंटकचे सचिव के. के. सिंग उपस्थित होते.