जाणून घ्या कोण आहे ‘बुल्ली बाई अॅप’ प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी श्वेता सिंह ?

जाणून घ्या कोण आहे ‘बुल्ली बाई अॅप’ प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी श्वेता सिंह ?

bulli-bai-app-case-in-mumbai
जाणून घ्या कोण आहे ‘बुल्ली बाई अॅप’ प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी श्वेता सिंह ?

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – ९७६८५४५४२२

मुंबई : ‘बुल्ली बाई अॅप’ प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून १८ वर्षीय श्वेता सिंह या आरोपी तरुणीला ताब्यात घेतलं आहे. याआधी या प्रकरणात आरोपी विशाल कुमार झा याला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून श्वेता सिंह ही मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे आरोपी श्वेता सिंह ?

उत्तराखंडमध्ये राहणारी श्वेता सिंह ही ‘बुल्ली बाई अॅप’ प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेताने ‘बुल्ली बाई अॅप’च्या माध्यमातून अनेक मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून बदनामीचा प्रकार सुरू केला होता. यानंतर १८ वर्षीय असलेल्या श्र्वेता सिंहला उत्तराखंडच्या उधमसिहं नगर येथून अटक केली.

दरम्यान, श्र्वेताच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले, तर आईचे काही वर्षांपूर्वी कर्करोगामुळे निधन झाले. श्र्वेताची मोठी बहिण काॅमर्स शाखेची विद्यार्थी आहे. तसेच इतर भाऊ-बहिण शालेय शिक्षण घेत आहेत. तर श्र्वेता सध्या इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

श्वेताचे नेपाळ कनेक्शन ?

आरोपी श्वेता नेपाळच्या सोशल मीडियावरील मित्राच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जियाऊ नामक नेपाळी नागरिक आरोपी श्वेताला त्या अॅपबद्दल माहिती देत होता. सध्या पोलीस कथित नेपाळी नागरिक आणि श्वेताशी संबंधित अन्य लोकांचा शोध घेत आहे.

श्वेताच्या नावाचा खुलासा हा सर्वात आधी अटक केलेल्या विशाल कुमार झा याने केला. त्यानंतर आरोपी श्वेताला उत्तराखंड येथून अटक करण्यात आली. आरोपी विशाल कुमार हा इंजिनीअरींगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.