Home latest News ऊश्राळ मेंढा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती से.नि.पोस्टमास्तर सोमदेव डोर्लीकर यांचा...

ऊश्राळ मेंढा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती से.नि.पोस्टमास्तर सोमदेव डोर्लीकर यांचा सत्कार

78

ऊश्राळ मेंढा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

से.नि.पोस्टमास्तर सोमदेव डोर्लीकर यांचा सत्कार

ऊश्राळ मेंढा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती से.नि.पोस्टमास्तर सोमदेव डोर्लीकर यांचा सत्कार

     राजेश बारसागडे
अप्पर तालुका प्रतिनिधी
    8830961332

तळोधी (बा.) :- नागभीड तालुक्यातील ऊश्राळ मेंढा येथील
महिलां व ग्रामपंचायतच्या सहकार्याने येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश लोंढे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामदास तोडासे,शेंद्रे ग्रा.पं.सदस्य आशा बोरकर,शेवंता बनसोड सविता सयाम,पोलीस पाटील विनोद सयाम माजी सरपंच विजू डोर्लीकर,माजी सरपंच सौ.लांजेवार आदी मान्यवर व गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिलां व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाच्या औचित्याने गावातील सेवा निवृत्त पोस्टमास्तर सोमदेव डोर्लीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात गावात उत्कृष्ट सेवा दिली. त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायततर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच हेमराज लांजेवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खडतर अशा जीवनकार्याचा व समाजकार्याचा परिचय करून दिला.संचालन नंदा लोंढे यांनी केले.