
प्रशांत जगताप
५ जानेवारी २०२१: ‘अनाथांची माय’ अशी सर्वदूर ओळख असलेल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालं आहे. सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची वार्ता माहित होताच त्यांच्या चाहत्यात शोकाची लहर पसरली.
सिंधूताई सपकाळ यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसापुर्वी सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यानी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी 2021 मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारने त्याना पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील खेडेगाव असलेल्या नवरगाव येथे सिंधूताईंचा जन्म झाला. . शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष.
बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या. कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला आणि मग त्या अनाथाच्या माई झाल्या.