नागपूर पाणी पाहिजे तर पैसे द्यावे लागेल महानगर पालिका..

54

नागपूर पाणी पाहिजे तर पैसे द्यावे लागेल महानगर पालिका

विदर्भ राज्य आंदोलन समिती ने जगनाथ बुधवारी ओ.सी.डब्लू कार्यालयात दिली धडक.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर:- तुकाराम नगर कलमना रोड येथील नागरिकांनी 11/10/2020 ला पिण्याच्या पाणीचे नळ कनेक्शन करता अर्ज केले असता, 25 दिवस लोटून गेल्या नंतरही तेथे ओ. सी.डब्लू द्वारे नळ कनेक्शन लावण्यात आले नाही, मागील एक महिन्या पासन तुकाराम नगर येथील नागरिकांना पाणीचा कोणताही दुसरा पर्याय नाही आहे, आणि सर्व नागरिक एक महिन्या पासून महानगर पालिकेचे चक्कर काटून संतापले, दि:- 4/11/2020 ला सर्व नागरिकांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीला संपर्क साधला आणि ओ.सी.डब्लू द्वारे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले,

आज 5/11/2020 ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांनी जगनाथ बुधवारी येथील महानगर पालिकेच्या कार्यालयावर धडक दिली, कार्यकारी अभियंता एम. शहा सोबत चर्चा केल्या नंतर, महानगर पालिके द्वारे झालेली चूक व O.C.W ची चूक त्यांच्या लक्षात आली. गलती मान्य केल्या नंतर, आज तिथे एक पिण्याच्या पाणीचे कनेक्शन त्वरित लावूनआणि बाकीचे लंबीत कनेक्शन 3 दिवसाच्या आत करून असा आश्वासन दिला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीने महानगर पालिका आणि O.C.W द्वारे होणारे त्रास पाणी बिल ची समस्या चे निवारन नाही झाला तर तीव्र आंदोलन ची चेतावणी पूर्व नागपूर अध्यक्ष नितीन अवस्थी यांच्या द्वारे देण्यात आली,

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता एम.शहा यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना नागपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, मध्य नागपूर महिला आघाडी अध्यक्षा सुनीता येरणे,पूर्व नागपूर अध्यक्ष नितीन अवस्थी, वार्ड क्रमांक-4 अध्यक्ष आशु सिंग, दुर्गाबाई गुप्ता, राधा यादव, सुरेश यादव, राधिका मिश्रा, किशोर लांजेवार, सूरीला तिवारी, उमेश मिश्रा, शिवानी देवी आदी उपस्थित होते.