कापूरबावडी येथे न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेमार्फत विशेष अंगणवाडी व बालवाडी वर्गाची सुरुवात

13

कापूरबावडी येथे न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेमार्फत विशेष अंगणवाडी व बालवाडी वर्गाची सुरुवात

ठाणे | कापूरबावडी: परिसरात फेरीवाले, विक्रेते व मजूर कुटुंबातील इथे-तिथे भटकणाऱ्या मुलांसाठी न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेमार्फत विशेष अंगणवाडी व बालवाडी वर्ग सुरू करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा आहे. विशेष म्हणजे, फ्लायओव्हरखाली अशा प्रकारची अंगणवाडी सुरू होणे ही दुर्मिळ गोष्ट असून, त्यामुळे हा उपक्रम कापूरबावडी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हा उपक्रम संस्थेच्या संचालिका मा. अनिता खरात मॅडम व सहशिक्षिकांच्या प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडला.

न्यू प्रगती शैक्षणिक संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित, आदिवासी, झोपडपट्टीतील तसेच वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी मोफत बालवाडी व अंगणवाडीचे वर्ग चालवत आहे. त्यांच्या या कार्यामुळे वंचित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न साकार होत आहे.

संस्थेसंदर्भात अधिक माहिती सदर वेबसाइटवरून मिळवू शकता.

https://www.newpragatieducation.org/