Home latest News रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष अमित तांबे यांना...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष अमित तांबे यांना शुभेच्छा

118

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष अमित तांबे यांना शुभेच्छा

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर मध्य जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. अमित तांबे साहेब यांना कलिना विधानसभा अध्यक्ष मा. श्रावण मोरे, सरचिटणीस मा. विजय सकपाळ तसेच अन्य कार्यकर्त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

या भेटीत पक्ष संघटन बळकटीकरण, नव्या कार्यकर्त्यांचे संघटनात स्वागत आणि आगामी निवडणूक तयारीबाबत चर्चा झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष अमित तांबे यांनी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मध्य जिल्ह्यात पक्ष अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.