१७ वर्षीय तरुणाचा रानवली धारणामध्ये बुडून मृत्यू .

✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन :- कोरोना अंतर आता राज्यात सर्व ठिकाणे खुली करण्यात आली आहेत. सर्व शाळा कॉलेज यांच्या परिक्षा आटपल्याने लोक पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. तसेच राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. अशामध्येच काल श्रीवर्धन मधील रानवली गावात एक दुःखत घटना घडली.
सुट्टीचा आनंद घेण्या साठी व पोहण्याचा मोह न आवरल्या ने परवानगी नसताना सुद्धा रानवली येथील धरणावर ५ मुले दिनांक ५ मे 2022 रोजी संध्याकाळी 4 वा.३० मी.पाण्यामध्ये पोहण्या साठी गेली असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच बुडून मृत्यू झाला. सदरचा मयत मुलगा हा रानवली गावातलाच असून कु. हर्ष प्रमोद चोरगे.वय वर्ष १७ असा परिचय आहे. काल उशिरा पर्यंत स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम चालू होती. पर्यंतु हाती काहीच आले नाही.
आज दिनांक ६ मे २०२२ रोजी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. उमेश खिरड. साहेबांनी महाड येतील स्पेशल रस्क्यू टीम बोलावून सकाळी लवकरच पुन्हा शोध मोहीम चालू केली असता, सकाळी १० वा. ३० मी. च्या सुमारास मृत देह हाती लागला. या मुलाचे काल वाढदिवस असल्या कारणाने ही मुले धारणा वरती गेल्या असल्याचे समोर आले.त्या घटनेने सर्व लोकांन मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रानवली गावात शोक व्यक्त होत आहे सदराचा घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. उमेश खिरड. करत आहेत.








