माणगाव शहरामध्ये चोरी चे वाढते प्रमाण /टू व्हीलर चोरी /चोर फरार

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
📞*9271723603*📞
माणगाव शहरामध्ये चोरीचं सूत्र चालूच दागिने लुटारू तर कधी टू व्हीलर चोरणे घरफोडी करणे अशा दिवसेंदिवस चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशाच एका बिल्डिंग मध्ये दिनांक ०३|०६|२०२२ रोजी सायंकाळी १७|३०, मिनिटांनी ते दिनांक०३ |०६| २०२२, रोजी सायंकाळी १९/ ३० मिनिटाच्या सुमारास माणगाव मौजे बामनोली रोड रामेश्वर बिल्डिंग तालुका माणगाव येथे राहत असलेल्या श्री, स्वप्निल दत्तात्रय लहाने ,वय ३२,, रूम नंबर २०२, रामेश्वर बिल्डिंग , बामनोली रोड, माणगाव ,यांच्या ताब्यातील १४,०००| रु, ( चौदा हजार) किमतीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाइन मोटर सायकल नंबर, एम एच ,०६ बी जे, २५९० व इंजिन नं, जे ,सी, ३६,ई ७७८९५१६६ एम ,ई ४ जे, ओ,३६,के,जे,डी,७२९४०१२ जू,वा,की ,अ, ही मोटरसायकल एका अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरता लबाडी च्या हेतूने चोरून नेली सदर फिर्यादी स्वप्निल दत्तात्रय लहाने माणगाव येथे गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला असून तपासी अंमलदार/पोना /१६२४ खिरिट, माणगाव पोलीस ठाणे दाखल अंमलदार_ मपोह/१६४ कोंजे, व्हिजीट /पोसई /श्री ‘,आघाव माणगाव पोलीस ठाणे पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत,








