भिवंडी पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षांच्या मुलाचा सांगडा.

दयानंद सावंत प्रतिनिधी

भिवंडी:- येथील समरुबाग परिसरातील इमारतीच्या पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून तो नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. अखेर गुरुवारी रात्री इमारतीच्या बेसमेंटला असलेल्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.

24 नोव्हेंबर पासून फारुकी बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतरर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर दीड महिन्यांनंतर इमारतीच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.

त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फारुकीच्या सांगाडा अवस्थेत सापडेलल्या मृतदेहाची ओळख पटली असून पोस्टमार्टमसाठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन  फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना गुरुवारी रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला.

त्याचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या सात वर्षीय फारुकीचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here